दोन-तीन दिवसांत होणार विधानसभा निवडणुकीची घोषणा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासह तीन राज्यांत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा दोन-तीन दिवसांत केली जाण्याची शक्यता आहे. आयोगाची आज गुरुवारी यासंदर्भात बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये वर्षाच्या अखेरला निवडणूक होणार आहे. . प्रथम महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये, तर नंतर झारखंडमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र व हरियाणातील निवडणूक दिवाळीआधी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यामुळे दिवाळीपूर्वीच राज्यात नव्या सरकारची स्थापना झालेली असेल. महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८, हरियाणातील ९० आणि झारखंडमधील ८२ जागांवर वर्षाच्या अखेरला निवडणूक होणार आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्र व हरियाणात २० सप्टेंबर रोजी निवडणूक जाहीर करण्यात आली होती.

१५ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी निकालांची घोषणा करण्यात आली होती. तर नक्षलग्रस्त झारखंडमध्ये २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरदरम्यान पाच टप्प्यांत मतदान झाले होते. विशेष म्हणजे या तिन्ही राज्यांत भाजपने सत्ता मिळवली होती.

अहमदनगर लाईव्ह 24