अहमदनगर :- भाषणात बोलताना आपण ‘देखणा माणूस’ असा शब्द वापरला आहे. देखणी महिला किंवा स्त्री असा शब्द प्रयोग नाही. त्यामुळे अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी गैरसमज करून घेऊ नये.
मी त्यांना उद्देशून मुळीच बोललो नव्हतो, तरीही त्यांना तसे वाटत असेल तर मी माझे शब्द मागे घेतो,’ असे खुलासा खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला आहे.
ते म्हणाले, त्या भाषणात देखणा माणूस हा शब्द आहे. त्यात स्त्री लिंग, पुल्लिंग किंवा कोणाच्या नावाचा उल्लेख नाही.
एवढ्या वर्षांच्या राजकारणात माझ्यावर किंवा आमच्या कुटुंबावर संस्कार नाहीत, असा आरोप कधीच झाला नाही. देखणा माणूस आमचे कार्यकर्ते हराळ हे सुद्धा असू शकतात.
तेही स्मार्ट आहेत. जीन्स घालून फिरत असतात. मात्र, माझ्या भाषाणामुळे कोणाला दु:ख झाले असेल तर मी माझे शब्द मागे घेतो.
आपण हे त्यांना उद्देशून मुळीच बोललो नव्हतो. स्त्री जातीचा किंवा कोणाच्या नावाचाही उल्लेख आपण केला नव्हता.