अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यातील भाजप च्यावतीने दक्षिण, उत्तर व नगर शहर या तीन विभागाच्या जिल्हाध्यक्षा साठी आज शुक्रवारी कोहिनूर मंगल कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती झाल्या.
विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे व संघटन मंत्री किशोर काळकर यांनी मुलाखती घेतल्या असून तिन्ही जिल्हाध्यक्षाची घोषणा प्रदेश पातळीवरून होतील असे बागडे यांनी इच्छुकांना सांगितले.
याबाबत प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील असे सांगून आजचा जिल्हाध्यक्षांच्या निवडीचा चेंडू थेट प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात गेला आहे.
दक्षिणेतून तब्बल- 17 , उत्तरेतून – 14 व नगर शहरांमधून ७ जणांनी मुलाखती दिल्या आहेत. अशा एकूण 38 जणांनी मुलाखती दिल्या आहेत.
चर्चेत असणारे माजी आमदार शिवाजीराजे कर्डीले यांनी मात्र नगर दक्षिणेतून मुलाखत दिली नाही. त्यामुळे दक्षिणेचा जिल्हा अध्यक्ष कोण होणार याबाब चर्चेला उधाण आले आहे.
उत्तरे मधून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मुलाखत दिली आहे, तर नगर शहरांमधून माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी मुलाखत दिली आहे.
त्यामुळे दक्षिणेसाठी दक्षिण उत्तर व नगर शहरासाठी कोण जिल्हाध्यक्ष होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.