अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी कुठलेही राजकारण नाही.
परंतु भाजप नेत्यांनी त्यात राजकारण आणले आहे. असा गंभीर आरोप उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे.
सद्यस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर कायदेशीर बाबी तपासण्याची प्रक्रिया चालू आहे. लवकरच विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे मते जाणून घेतली आहेत. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये अनेकांना नोकऱ्या मिळतात.
कोरोनात परीक्षेची टांगती तलवार राहिली तर आरोग्यास व जीवितास धोका होऊ शकतो. परीक्षा पुढे ढकलली तर नोकरीची संधी जाईल. विद्यार्थी मानसिकता तणावाखाली राहतील.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व सर्व विद्यापीठांचे कुलगुरू यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका झाल्या असून, यूजीसीच्या मार्गदर्शन सूचनांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा जुलैमध्ये घेण्याचे ठरले आहे.
परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जुलै महिन्याची परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री उदय सामंत, सर्व विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या समवेत अंतिम वर्षाच्या परीक्षेविषयी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या चर्चेत विद्यार्थ्यांची बाजू सांगितली.
त्यावर अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करून मागील सर्व सेमिस्टरचा सरासरी गुण द्यावेत. ज्या विद्यार्थ्यांना गुण वाढविण्यासाठी परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी जुलैनंतर परीक्षा घ्यावी. याविषयी सर्वांचे एकमत झाले असल्याचे तनपुरे यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews