श्रीगोंदा : अधिकारी पाण्याचे नियोजन करत असताना त्यांना सहकार्य करणे योग्य की त्यात खोडा घालणे योग्य हे समजून घेतले पाहिजेत.
पाणी प्रश्नी श्रेय मला मिळू नये म्हणून प्रत्येक वेळी आवर्तनात खोडा घालणारे पाचपुतेच खरे झारीतील शुक्राचार्य आहेत. अशी टीका आमदार जगताप यांनी केली.
तालुक्याला वरदान ठरलेल्या कुकडी अवर्तनाचे योग्य नियोजन करून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन फळबागांना तसेच तालुक्यातील जास्तीत जास्त तलावांत पाणी सोडून शेततळ्यांनाही जास्तीत जास्त पाणी कसे मिळेल याकडे लक्ष दिले.
विशेषकरून दुष्काळाची तीव्रता खूप अधिक असताना एकही आंदोलन होऊ न देता कुकडीच्या अवर्तनाचे योग्य नियोजन केले, असे आमदार राहुल जगताप यांनी प्रसिद्धीत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
आ.जगताप म्हणाले यावेळी भीषण दुष्काळ असतानादेखील पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनातून फळबागांना पाणी कसे दिले जाईल यासाठी नियोजन केले.
पण याउलट पाचपुतेच्या काळात खूप मोठी आंदोलने होऊन सुद्धा पाणी मिळत नव्हते.
याउलट भीषण दुष्काळात सर्व चाऱ्यांना पाणी दिले तेही एकही आंदोलन न होता हाही एक योग्य नियोजनाचा भाग आहे असा टोला आमदार जगताप यांनी लगावला.
विसापूर खालील शेतकऱ्यांना आवर्तनातून लगेचच पाणी मिळावे, यासाठी स्वखर्चाने ४५ नंबर चारीचे काम केले. पण त्यात वरिष्ठ अधिकारी तसेच मंत्री मोहदया पर्यंत तक्रारी करून बंद पडण्याचे काम केले.
त्यामुळे पाचपुतेंनी एका बाजूने शेतकऱ्यांचा खूप कळवळा असल्याचे दाखवले तर दुसऱ्या बाजूला त्याच सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अन्नात विष कालवण्याचे काम करीत आहेत,अशी टीका आमदार जगताप यांनी केली.