गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच माझ्या राजकारणाला दिशा – आ.शिवाजी कर्डिले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राहुरी :- लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच माझ्या राजकारणाला दिशा मिळाली, त्यांच्यामुळेच राहुरी मतदारसंघातून मला भाजपची उमेदवारी मिळाली व पाचव्यांदा आमदार होण्याची संधी मिळाली.

मुंडे यांच्या नंतर त्यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांनीदेखील राहुरी मतदारसंघासाठी भरीव निधी देऊन मुंडे -कर्डिले कुटुंबाचे ऋणानुबंध जोपले, असे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

पाथर्डी तालुक्यातील निंबोडी, देवराई, घाटशिरस येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजनप्रसंगी आ. कर्डिले बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती बाळासाहेब अकोलकर होते.

निंबोडी येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण व भूमिपूजन तसेच ब्रम्हणाथवस्ती रस्ता खडीकरण, देवराई येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन , घाटशिरस येथे विज्ञान केंद्राचे उद्घाटन,आदी दीड कोटी रुपये खर्चाचे विकास कामांची सुरुवात आ. कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आली.

या वेळी जि. प. सदस्य पुरुषोत्तम आठरे ,पं.स. सदस्य सुनील परदेशी, रवींद्र वायकर, एकनाथ आटकर, वन अधिकारी मनोज धनविजय, युवानेते अनिल पालवे, कुशल भापसे, बंडू पाठक, धीरज मैड, सोमनाथ कातखडे लक्ष्मण गवळी, संतोष शिंदे, सरपंच रेणुका शेरकर, उपसरपंच रवींद्र भापसे, कुंडलिक भापसे, बंडू भापसे, हरिभारऊ कारखेले,

शिवाजी कारखेले,सरपंच ताराबाई क्षेत्रे, उपसरपंच पुष्पा पालवे, माजी सरपंच रविभूषण पालवे, राजेंद्र पालवे, संभाजी पालवे, सरपंच इंदूबाई चोथे, जालिंदर पाठक, दादासाहेब चोथे, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, विस्तार अधिकारी अनिल भवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24