सुजय विखे यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी नगरमध्ये सभा घेणार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरमध्ये सभा घेणार आहेत.

ही सभा सावेडीतील संत निरंकारी भवनाशेजारच्या मैदानावर होणार आहे. या मैदानाची पोलिस प्रशासनाने पुन्हा पाहणी केली.

मोदी यांच्या सभेसाठी झेड प्लस सिक्युरिटी असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हे मैदान योग्य असल्याने तेथे सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सभेसाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून सभेची तारीख येत्या दोन दिवसांत मिळण्याची शक्यता आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
Tags: Sujay Vikhe