येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्हा भाजपमय – डॉ.सुजय विखे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कोपरगाव : देशात आणि राज्यात भाजप महायुतीची लाट असून त्याचा प्रत्यंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आला.

तेव्हा येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्हाच भाजपमय करून सर्वच्या सर्व जागा भाजपा – सेना महायुतीच्या निवडून आणून बारा विरुद्ध शून्य असा इतिहास घडविण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने खा. डॉ. विखे यांचा कारखाना कार्यस्थळावर सत्कार करण्यात आला.

त्याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे होते. सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे प्रास्ताविकात म्हणाले, डॉ. सुजय विखे यांचा तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क असून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्याचा वारसा त्यांच्याकडे आहे.

कॉमन मॅन म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. म्हणूनच ते सर्वाधिक मताधिक्क्याने खासदार झाले. त्यांना देशपातळीवर काम करण्याची निवडणुकीत वैचारिक पातळी सोडून आपल्यावर व कुटुंबावर जुन्या जाणत्या नेत्यांसह अनेकांनी टीका टिपण्णी केली

पण आपण कधीही पातळी सोडली नाही व सोडणार देखील नाही. जनता जनार्दन मतदारांनी मात्र त्याचे उत्तर दिले. आगामी निवडणुकात जिल्हाच भाजपमय करण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. त्यात नक्कीच यश मिळेल.

दक्षिण – उत्तरेत शेती सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे . राजकारणात जनतेचे प्रश्न महत्त्वाचे असतात. यासाठी दोन्ही खासदारकीच्या माध्यमातून ते निश्चित सोडवू, असा आत्मविश्वास डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला.

अहमदनगर लाईव्ह 24