जोरदार शक्तिप्रदर्शन करत सुजय विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- नगर दक्षिण मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत सोमवारी उमेवारी अर्ज दाखल केला.

दिल्लीगेट पासून पायी रॅली काढून सुजय विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.

डाॅ.सुजय विखे पाटील यांनी शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीचे दर्शन घेतले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राम शिंदे, पशुसंर्धन मंत्री महादेव जानकर, विधानसभा उपाध्यक्ष विजयराव औटी, शिवसेना उपनेते अनिल राठोड, खा. दिलीप गांधी, आ. शिवाजीराव कर्डिले,

आ. स्नेहलता कोल्हे, आ. मोनिका राजळे, बबनराव पाचपुते, भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, अभय आगरकर, शिवसेना, भाजपसह सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24