अहमदनगर :- विधानसभा निवडणूका जवळ आल्या आहेत. अनेकांना वाटते की आपण प्रयत्न करावेत,
यासाठी गोरगरीब जनतेसाठी काही कार्यक्रम राबवले जात आहेत. त्याला मोठी प्रसिध्दी मिळत आहे.
मात्र राम शिंदे यांनी त्यांच्यापेक्षा किती तरी पटीने गोरगरीबांचे कामे गेल्या पाच वर्षांमध्ये केली आहेत, अशी पवार यांचे नाव न घेता श्री विखे यांनी टीका केली.
पालकमंत्री राम शिंदे यांना निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतली आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी कर्जत येथे केले.
कर्जत येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनाचे उदघाटन पालकमंत्री प्रा. राम शिदे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पवार कुटुंबांचे नाव न घेता टीका केली.
खासदार सुजय विखे पाटील म्हणाले, जिल्हयामध्ये सर्वात जास्त निधी राम शिंदे यांनी कर्जत -जामखेड तालुक्यांना आणला.
तरीही मला मात्र मोठी आघाडी का मिळाली नाही याचे कोडे पडले आहे. हा जनतेचा दोष नाही. जे केले ते जनतेपर्यंत पोहचवले नाही.
राम शिंदे हे प्रसिध्दीमध्ये कमी पडले आणि त्याचा फटका बसला आहे, असे खा. डॉ. विखे यांनी स्पष्ट केले.
आपण जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी ही योजना राबवीणार आहोत. याची सुरवात कर्जत तालुक्यापासून करणार आहोत.
यामध्ये गोरगरीब नागरीकांना त्यांच्या घरपोच रेशनकार्ड आणि डोलचे पैसे देणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.