राधाकृष्ण विखेंच्या स्वप्नांवर पाणी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- दिल्लीतून मंत्रीपदासाठी सिग्नल मिळत नसल्याने काँग्रेस सोडणारे राज्याचे माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला आहे.

थेट दिल्ल्लीतूनच विरोध झाल्याने भाजप सरकार मध्ये मंत्रीपदाचे स्वप्न पहाणार्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्वप्नावर तूर्तास तर पाणी पडले आहे.

लोकसभेच्या निकालानंतर माजी विरोधी पक्षनेते विखे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात येत असतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी

विखेंचा भाजप प्रवेशाबाबत प्रदेश भाजपला सूचना देतानाच त्यांचा एवढ्यात मंत्रिमंडळात समावेश करू नका, अशी सूचना दिली आहे. 

विखे यांचा मंत्रिमंडळात होत नसलेला समावेश मात्र विखे समर्थकांसाठी डोकेदुखी वाढणारा ठरणार आहे. 

विखेंचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला असताना दुसरीकडे काँग्रेसमधील त्यांचे विरोधक असलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाली आहे.

माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी अधिकृतरीत्या अद्याप भाजपमध्ये प्रवेश केला नसला तरी त्यांचे बसणे उठणे हे भाजपच्या नेत्या बरोबर सुरू झालेले आहे.

विखे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत दिल्लीतून ब्रेक लागल्याने भाजप प्रदेश ने सध्या विखे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाबाबत मौन पाळले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24