राहुरीच्या विकासासाठी विखे-कर्डिले ही जोडी कायम राहील !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राहुरी :- देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री मागील ५० वर्षांत महाराष्ट्राला लाभला नाही, असे सांगत निळवंडे कालव्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने ही जनादेश यात्रा असली, तरी जनतेने आभार यात्रा म्हणून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे यांनी बुधवारी केले.

मी आमदार कर्डिंलेचे नाव कायम घेत असताना माझे नाव घेण्याची आठवण त्यांना करून द्या, असा टोला डॉ. विखे यांनी मारताच बैठकीत हास्यकल्लोळ झाला. महाजनादेश यात्रा २५ ला दुपारी राहुरीत येत असून तिच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत डॉ. विखे बोलत होते.

अध्यक्षस्थानी आमदार शिवाजी कर्डिले होते. विखे व कर्डिले एकाच वाहनातून आल्याने कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाट केला. डॉ. विखे म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर कर्डिले व माझ्याबाबत चर्चेला उधाण आले. अनेकांनी विपर्यास केला.

तुम्ही विधानसभा निवडणुकीत काय करणार असा सवाल काहींनी केला. जो माणूस गेली अनेक वर्षे जनतेत आहे, त्यांना जनता निवडून देणारच आहे. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून निवडणुका लढवू नका. राहुरीच्या विकासासाठी विखे-कर्डिले ही जोडी कायम राहील.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24