महाराष्ट्र

राज्यसभा निवडणूक : मतदान पूर्ण, पाच वाजता सुरू होणार मोजणी

Published by
Ahmednagarlive24 Office

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व आमदारांचे मतदान वेळसंपण्यापूर्वीच पूर्ण झाले आहे. त्यामुळे पाच वाजता मतमोजणीला सुरवात होऊन सात वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या २८७ आमदार आहेत. त्यापैकी तुरूंगातील अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करण्याची परवानगी मिळू शकली नाही. त्यामुळे विधानसभेतील २८५ आमदारांनी मतदान केले आहे.

आता सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि ७ वाजेपर्यंत निकाल जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. यावेळी ही निवडणूक चुरशीची झाली. मतदानाच्या शेवटच्या टप्यापर्यंत आक्षेप घेणे आणि तिकडे मलिक यांच्या मतदानासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. सत्ताधारी व विरोधक दोघांनीही विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

Ahmednagarlive24 Office