अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- कधी कुणाच्या कलेला पंख फुटतील, किंवा कधी कोठे संधी मिळेल सांगता येत नाही. पण कलाकार या संधीचे सोने केल्याशिवाय राहत नाही. असच काहीस झालंय श्रीगोंदे तालुक्यातील पूनम संजय तुपे यांच्या बाबतीत.
पिसोरेखांड येथील कोंगजाई डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या पूनम यांचा .. मी लय वेड्यावाणी करते हा टिकटॉक व्हिडिओ राज्यभर चांगलाच गाजतो आहे.
वर्षभरात पूनम यांच्या विविध व्हिडिओंना ५० लाख ‘लाईक्स’ मिळाले तर त्यांचे १ लाख ६८ फॉलोअर्स आहेत. पूनम यांचे मूळगाव इंदापूर तालुक्यातील वरकुटे.
शिक्षण सातवीपर्यंत झाले आणि २००८ मध्ये पिसोरेखांड येथील संजय तुपे यांच्याशी विवाह झाला. संजय हे श्रीगोंदा येथे एका किराणा दुकानात हमाली करतात.
पूनम या शिलाई मशीनचे काम करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी टिकटॉक अॅप डाऊनलोड करून घेतले. त्यानंतर मराठी, हिंदी गाण्याचे व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली.
पूनम यांचे व्हिडिओ पाहून काहींनी ‘बया जरा वेडी आहे, बधीर आहे’ अशी टिंगल केली. त्यावर पूनम यांनी ‘..म्हणूनच मी लय वेड्यावाणी करते’, हा व्हिडिओ टिकटॉकवर टाकला.
त्यानंतर या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. पूनम यांच्या व्हिडिओंना ५० लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या असून त्यांचे १ लाख ६८ हजार फॉलोअर्स आहेत.
पूनम यांच्याकडे कोणतेही तंत्रज्ञान नाही. त्यांना पती सोडता कोणाचे सहकार्यही नाही. जिद्द, आत्मविश्वास यांच्या जोरावर काय करता येऊ शकते याच उदाहरण प्रस्थापित केल आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com