रस्त्याची दुरवस्था; ‘शोले’ चित्रपटाचे मिम्स वापरून सोशल मीडियावरही चर्चा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्याला रस्त्याच्या दुरवस्थेचा मोठा शाप लागला आहे. शहरांतर्गत रस्ते, नगर- मनमाड रोड, नेवासा -श्रीरामपूर रास्ता आदी रस्त्यांची भयंकर दुरवस्था झाली असून याबाबत अनेकदा आंदोलने झाली आहेत.

रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यामुळे अनेक अपघात घडले आहेत. आता नेवासा-श्रीरामपूर रस्त्याच्या दुरवस्थेची चर्चा सोशल मीडियावरही होत आहे.

‘शोले’ चित्रपटामधील जय आणि विरु यांचा फोटो वापरून या रोडच्या दुरवस्थेची खिल्ली उडवली जात आहे. या मेसेजची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत असून रस्त्याचे काम करण्याची मागणी होत आहे.

* काय होतोय मेसेज व्हायरल? :- शोले चित्रपटामधील सिन यात दाखवला जात आहे. हिंदी चित्रपट कलाकार धर्मेंद्र अमिताभ बच्चन यांना गोळी लागल्यावर विचारतो

तो फोटो वापरून अनेकांनी या धर्मेंद्र अमिताभ बच्चन यांना विचारतो की कुठे पडला? तर अमिताभ बच्चन नेवासा-श्रीरामपूर रोडवर पडलो असे उत्तर देतो.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24