Post office Yojana : जबरदस्त योजना ! फक्त 100 रुपयांची गुंतवणूक, आणि मिळेल लाखोंचा रिटर्न; जाणून घ्या खास योजना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post office Yojana : जर तुम्ही एका दमदार योजनेची वाट पाहत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसची फक्त 100 रुपयांची गुंतवणूक करून लाखो रुपये कमवून देणाऱ्या योजेबद्दल सांगणार आहे.

दरम्यान, पोस्ट ऑफिसची एक खास योजना आपल्याला अशी ही संधी देत आहे. पोस्ट ऑफिसच्या RD या योजनेमध्ये खूप कमी पैशात गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेमध्ये आपण गुंतवलेल्या पैशाची सुरक्षितता दिलेली असते आणि त्याच बरोबर आपल्याला परतावाही चांगल्या प्रकारे मिळतो.

पोस्ट ऑफिसमधील RD अकाउंट हे सर्वात कमी हप्त्यांमधील ठेव तसेच जास्त व्याजदर आणि सरकारी हमी असलेली योजना आहे. पोस्ट ऑफिसच्या RD या योजने बद्दल तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घ्या.

गुंतवणूक फक्त 100 रुपयांची

पोस्ट ऑफिस मधील RD या योजनेमध्ये आपण कमीत कमी 100 रुपये गुंतवणूक करू शकतो. तसेच गुंतवणूक करताना आपण 10 च्या पटी मध्ये कितीही मोठी रक्कम जमा करू शकतो. पोस्ट ऑफिस मधील या योजनेत जास्तीत जास्त जमा करण्यात येणाऱ्या रकमेवर कसल्याही प्रकारची मर्यादा नाही.

दहा रुपयाच्या पटीत कितीही मोठी रक्कम आपण RD खात्यात जमा करू शकतो. पाच वर्षांच्या कालावधीसाठी पोस्ट ऑफिसमध्ये RD खाते उघडले जाते. पोस्ट ऑफिस च्या या योजनेत जमा केलेल्या पैशांवरील व्याज दर हा तीन महिन्यांनी बदलला जातो.

RD अकाऊंटमध्ये प्रत्येक तिमाहीच्या शेवटी आपल्या खात्यावर चक्रवाढ व्याज जोडून दिले जाते. पोस्ट ऑफिसच्या RD YA योजनेमध्ये सध्या 5.8 टक्के व्याज दर आपल्याला मिळत आहे.

RD अकाउंट कशा प्रकारे उघडावे ?

आपण आपल्या जवळ असणाऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपण आपले RD अकाऊंट उघडू शकता. तसेच आपण आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीसोबत जॉइंट अकाउंट देखील काढू शकता. आपण RD हे खाते हे फक्त 100 रू ने सुरू करू शकतो.

RD अकाऊंट उघडण्याचे नियम आणि अटी

RD खाते कोणतीही नागरिक हा त्याला पाहिजे तेवढी उघडू शकतो. पोस्ट ऑफिस मधील RD अकाऊंट च्या जास्तीत जास्त संख्येविषयी कोणतीही मर्यादा नाही. पोस्ट ऑफिस मधील RD खाते हे फक्त व्यक्तीच्या नावाने उघडले जाऊ शकते.

एखादे कुटुंब अथवा संस्थेच्या नावाने RD खाते उघडता येत नाही. परंतु जोड RD अकाऊंट दोन प्रौढ व्यक्ती एकत्रितपणे उघडू शकतात. आपण या पूर्वी उघडलेले काढलेले तुमचे आरडी खाते हे कधीही संयुक्त खात्यात ट्रान्स्फर केले जाऊ शकते

यामुळे आपले आरडी अकाऊंट बंद केले जाऊ शकते

आपण RD हप्त्याचे पैसे दिलेल्या तारखेपर्यंत जमा केले नाहीत,तर लेट हफ्त्याबरोबरच , आपल्याला दर महिन्याला 1% इतका दंड सुद्धा जमा करावा लागतो. तसेच आपण सलग चार हप्ते जमा न केल्यास आपले RD अकाऊंट बंद करण्यात येते.

आपले RD खाते बंद झाल्यानंतरही, ते आपल्याला पुन्हा पुढच्या दोन महिन्यांकरीता चालू केले जाऊ शकते. या प्रक्रियेसाठी आपल्याला आपण RD काढलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करावा लागतो. नवीन हप्त्याबरोबरच मागील थकीत सर्व हप्ते आणि दंडाची रक्कम आपल्याला पूर्ण जमा करावी लागेल.