सरकारी नोकर भरती स्थगित करा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण स्थगित झाल्यानंतर मराठा समाज बांधव आता आक्रमक झाले आहे.

राज्यात ठिकठिकाणी सकल मराठा समाज बांधवानी आंदोलने केली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत सरकारी नोकर भरती स्थगित करावी,

अशी मागणी मराठा सकल समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे नेवासे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. नायब तहसीलदार संजयसिह परदेशी यांनी स्वीकारलेल्या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे.

त्या आदेशानुसार मराठा समाज आरक्षणाला स्थगिती दिली असल्याने राज्य सरकारने जवळपास 12 हजार जागांसाठी पोलिस भरती प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.

ती पोलिसभरती प्रक्रिया थांबवावी. तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा समाज आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत राज्य सरकारने कुठल्याही प्रकारची नोकर भरती करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, शहराध्यक्ष मनोज पारखे, ॲड.जी.डी. खिळदकर, अनिकेत वाघ, शशिकांत पारखे, विठ्ठल शिंदे, दादासाहेब आगळे, गणेश गायके, महेश आरले, प्रशांत वाघ यांनी निवेदन दिले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24