महाराष्ट्र

राज्यातील सत्तासंघर्ष, सुनावणी लांबणीवर

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News:महाराष्ट्रातीस सत्तासंर्घासंबंधी दाखल याचिकांवर उद्या सोमवारी ८ ऑगस्टला सुप्रिम कोर्टात होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे.

आता १२ ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यादिवशीही ती होणार का? त्याच दिवशी निकाल दिला जाणार का? की नवीन पीठासमोर प्रकरण जाणार? हेही नक्का सांगता येत नाही.

हे प्रकरण मोठ्या पीठाकडे द्यायचे की नाही, यावर सुनावणी होणार होती. आता ती लांबणीवर पडली असून सध्याचे सरन्यायाधीश २६ ऑगस्टला निवृत्त होणार आहेत.

सुनावणी लांबत राहिल्यास खंडपीठही बदलले जाण्याची शक्यताही आहे. सरन्यायाधीश एन. व्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर ही सुनावणी सुरू आहे.

आता रमणा २६ ऑगस्टला निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी न्यायमूर्ती उदय लळीत नवे सरन्यायाधीश होणार आहेत.

त्यामुळे त्या आधी हे प्रकरण निकाली काढले जाणार की नव्या सरन्यायाधीशांकडे निर्णय सोपविला जाणार? याचीही उत्सुकता आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office