अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लाभला आहे. साेमवारी शिवसेना १३, राष्ट्रवादी १३ आणि काँग्रेसच्या १० मंत्र्यांना राज्यपाल पद व गोपनीयतेची शपथ देतील.
नगर जिल्ह्यातून सेनेकडून आ. शंकरराव गडाख व राष्ट्रवादीकडून आमदार प्राजक्त तनपुरे यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार असून ते आज राज्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आलीय.
प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आहेत. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यास राहुरीला मंत्रिपदाचा पहिल्यांदाच मान मिळणार आहे.
भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव करून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख यांनी विजय मिळवला.
आमदार गडाख यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवून शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरवल्याने त्यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यावर असणारे विखे पाटलांचे प्रभुत्व मोडीत काढण्याची खेळी आता पुढील काळात राष्ट्रवादी खेळू शकते. त्यासाठी मंत्रीमंडळात सहभागी होताना मोठा खल होऊन जिल्ह्याची जबाबदारी कोणावर येते हे पाहावे लागणार आहे.