अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-प्राजक्त तनपुरे हे… लवकर तालुकावासियांना गुड न्यूज देतील ते तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील विकासाचे चांगले निर्णय घेतील.
प्राजक्तच जिल्ह्याच्या विकासाला गती देतील, असा विश्वास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मामा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
ते राहुरीत पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. भाऊबीजेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राहुरीतील डॉ. उषाताई तनपुरे यांच्या निवासस्थानी भाऊबीज साजरी केली.
भाऊबीजचे औचित्य साधत नगर जिल्ह्यातील राहुरीत आपल्या भगिर्नींची भाऊबीज भेट घेतली. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मातोश्री डॉ. उषाताई प्रसाद तनपुरे ह्या पाटील यांच्या भगिनी आहेत.
या ठिकाणी पाटील यांनी सायंकाळी भेट देत तनपुरे कुटुंबियांसमवेत भाऊबीजेचा आनंदोत्सव साजरा केला. यावेळी डॉ. उषाताई तनपुरेंनी मंत्री असलेल्या आपल्या भाऊरायाला प्रेमळपणे ओवाळून औक्षण केले.
याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना पाटील यांनी सांगितले की, आता राहुरीकरांना गुड न्यूज प्राजक्त देतील. ते राहुरी बरोबरच राज्याचा कारभार देखील चालवत आहेत अन् नगर जिल्ह्याच्या विकासाबाबत ते पुढाकार घेत आहेत आणि विकासाला ते गती देतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी तहसीलदार फसियोद्दीन शेख, मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, विविध विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते.
तालुक्यातील दौऱ्यामुळे अनेक कार्यकत्यांनी मोठी गर्दी केली होती तर याप्रसंगी श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, पोलिस निरीक्षक हनुमंतराव गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved