प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर केला ‘हा’ गंभीर आरोप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई /प्रतिनिधी पंतप्रधानांनी काल रात्री जनतेशी संवाद साधला. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर निशाणा साधला.

या संपूर्ण भाषणात गरजेच्या असलेल्या ठोस भूमिका न घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पंतप्रधानांना ठोस सांगायच नसेल तर लाईव्ह येऊन देशवासियांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण का करायचे ?

पंतप्रधानांना स्वत:हून कोणती वाईट किंवा कठोर बातमी देशासमोर द्यायची नाहीय. केंद्रीय अर्थमंत्री किंवा राज्यांतील मुख्यमंत्र्यांकरवी तशा बातम्या वदवून घेतल्या जातील.

कदाचित हा त्यांच्या पीआरचा भाग असावा अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. असंघटित कामगार आणि स्थलांतरित वर्गाच्या पदरी निराशाच पडलेली दिसत आहे.

मध्यम वर्गाची बाजू घेण्याच्या आणि आर्थिक दुर्बल वर्गाकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका तिसऱ्या टप्प्यात दिसून आली. याचीच पुनरावृत्ती चौथ्या टप्प्यातही सुरू असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24