पाथर्डी :- राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांच्या समर्थकांनी रविवारी (२८ जुलै) पाथर्डीत कार्यकर्ते, हितचिंतक आणि आप्तेष्टांचा निर्धार मेळावा आयोजित केला आहे. त्या वरून ढाकणेही वेगळा विचार करीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
ढाकणे यांच्या समर्थकांनी पाथर्डीत रविवारी मेळावा आयोजित केला आहे. सोशल मीडियातून त्याचे निमंत्रण दिले जात आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘काका आता ठरवायचं…… निर्धार मेळावा’ यात कोणत्याही पक्षाचे नाव नाही.
समर्थक, हितचिंतक आणि आप्तेष्टांचा मेळावा असल्याचे म्हटले आहे. यावरून ढाकणे यांनाही राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याची गळ घातली जाणार असा अंदाज बांधला जात आहे.