जनतेच्या आग्रहास्तव निवडणूक लढवणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पाथर्डी :- तालुक्यातील टाकळी टाकळीमानूर जिल्हा परिषद गट सातत्याने ढाकणे कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे यांना याच गटाने राज्यात व केंद्रात पाठविले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष कोणता असेल, चिन्ह कोणते असेल, हे सांगता येणार नाही, पण तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यावर आगामी विधानसभा लढवणार असल्याने खंबीरपणे साथ द्यावी, असे प्रतिपादन श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी केले.

टाकळीमानूर येथे कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी बाजार समितीचे माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट, संचालक वैभव दहिफळे, ज्येष्ठनेते बाबासाहेब ढाकणे, माजी सरपंच बाप्पासाहेब शिरसाट, राजेंद्र नागरे,

अंबिकानगर माजी सरपंच अर्जुन शिरसाठ, शहादेव शिरसाट, अप्पासाहेब शिरसाट, राजेंद्र मंडलेचा, आलम शेख, शेषराव ढाकणे, खेडकर मच्छिंंद्र मानकर, म्हातारदेव आव्हाड आदी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24