अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- शासकीय योजनाची नावे सांगत भोळ्याभाबड्या लोकांना फसवण्याचा पकार संगमनेर तालुक्यात उघडकीस आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सुनील पाटील नावाची एक व्यक्ती शुक्रवारी (ता.2) दुपारी पठारभागातील पिंपळगाव देपा परिसरात आली.
या भागातील मुक्ताईनगर वसाहतीतल्या काही आदिवासी घरांमध्ये जावून त्याने ‘तुम्हाला घरकुल मंजूर झाले आहे, त्यासाठी पंधराशे रुपये भरावे लागतील’ तसेच ‘स्वतंत्र रेशनकार्डही करुन देतो,
त्याचे अठराशे रुपये लागतील’ असे सांगत साडेतीन हजारांच्या रकमा जमा केल्या. तसेच कोणाला संशय येऊ नये म्ह्णून त्याने स्वतःचा नंबर देखील तेथील लोकांना दिला.
या भामट्याच्या बोलण्याला फसून काही नागरिकांनी त्याला पैसे देखील दिले. दोघा-चौघांना चुना लावून तो तेथून पसार झाला. त्यानंतर ज्यांनी पैसे दिले त्यांनी घरकुल मिळाल्याच्या आनंदात वस्तीवरील इतरांना ते सांगितले,
त्यामुळे आम्हालाही मिळेल का? अशा भाबड्या विचाराने त्यांनी त्याचा मोबाईल नंबर घेवून त्यावर फोन केला असता तो बंद असल्याचे आढळले.
त्यामुळे काहींचा संशय बळावल्याने त्यांनी पंचायत समितीचे सदस्य किरण मिंडे यांना फोन करुन विचारणा केली असता सदरचा प्रकार उघड झाला. याबाबत मिंडे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांना माहिती दिली.
शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेत सर्व ग्रामसेवकांना सतर्क राहण्याचे व नागरिकांनाही सावध करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी फसवणूक झालेल्या रवी मारुती मधे यांनी घारगाव पोलीस ठाण्यास तक्रार अर्ज दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved