महाराष्ट्र

मतदारसंघाच्या शोधात राजपुत्र ! खासदार श्रीकांत शिंदे मराठवाड्याच्या दौऱ्यावर…

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जनमानसाचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची भेट घेत संवाद साधणार आहेत. शिवसेनेच्या (ठाकरे) गटातून मात्र त्यांच्या या दौऱ्यावर ‘मतदारसंघाच्या शोधात राजपुत्र’ अशी टीका होते आहे.

शिंदे यांचे औरंगाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात झाले. त्याद्वारे स्थानिक नेत्यांनी शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न केला. ‘शिवसेनेचे १३ खासदार आमच्यासोबत आहेत. आता राष्ट्रवादी पक्षदेखील आमच्यासोबत आहे. भाजपकडून कल्याण मतदारसंघात किंवा औरंगाबादमध्ये लोकसभेची तयारी सुरू असली,

तरी त्याची चिंता तुम्ही करू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकत्र बसून जागावाटपावर निर्णय घेतील’, हा संदेश शिंदे या दौऱ्यात देत आहेत. पक्ष संघटनेच्या कामाचा अंदाज घेऊन त्याला गती देण्याच्या दृष्टीने शिंदे यांची चाचपणी सुरू असल्याचे समजते.

Ahmednagarlive24 Office