अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला पृथ्वीराज चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
शेतकऱ्यांसाठी कायदे करणारांना शेती कशी करतात हे माहिती तरी आहे का? असा प्रश्न सत्वशीला पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
तर शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत की अंबाणी अदाणींच्या फायद्याचे आहेत? असा झणझणीत प्रश्न केंद्र सरकारला विचारला.
पृथ्वीराज चव्हाण यांचे प्राबल्य असलेल्या दक्षिण कराड मतदारसंघात सत्वशीला चव्हाण चांगल्या सक्रीय असतात. त्यामुळे दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सत्वशीला चव्हाण या मैदानात उतरल्या आहेत. यावेळी त्यांना अटक करण्यात आली.