अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्य शासनातल्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. परंतु या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले नाही.
ते नसताना सरकारमधला एखादा वरिष्ठ मंत्री उपस्थित राहणे गरजेचे असताना त्यांनी या बैठकीस त्यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांना पाठवल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीला आपण उपस्थित राहणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आधीच राज्यपाल कोश्यारींनी कळवलं होतं. मुख्यमंत्री त्यांच्या जागी एखाद्या वरिष्ठ मंत्र्याला बैठकीसाठी पाठवतील, अशी शक्यता होती.
मात्र प्रत्यक्षात त्यांनी खासगी सचिवांना पाठवलं. दरम्यान कोरोनाचे संकट हाताळणीत राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. राज्य सरकारचा प्रत्येक बाबतीतला नाकर्तेपणा समोर येत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तसे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शिष्टमंडळाने दिले होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com