अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ बहुजन समाजाचे ओबिसी समाजाचे महाराष्ट्र राज्याचे नेते कर्तव्य दक्ष माजी कॅबिनेट मंत्री प्रा.राम शिंदे यांची विधान परिषेदेवर आमदार म्हणून निवड करुन बहुजन समाजाला
तसेंच ओबिसी व धनगर समाजाला न्याय देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्यातील समाज बांधवांच्या वतीने पांडुरंंग माने यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मौजे चौंडी गावचे सरपंच ते पंचायत समितीचे सभापती ते दोन वेळा आमदार व माजी मुख्यमंत्री देंवद्रजी फडवणीस यांच्या मंत्री मंडळात सुरुवातीला राज्यमंत्री नंतर चांगले काम केल्यामुळे कॅबिनेट मंत्री म्हणून एकूण १४ वेगवेगळ्या खात्याचे काम सांभाळली.
पाच वर्षात मंत्री म्हणून कुठल्याही वादात अथवा त्यांच्यामुळे पक्ष अडचणीत आला नव्हता. या सर्व जमेच्या बाबींसह आभ्यासु, आक्रमक वक्तृत्व आणि राज्यभर संबंध असलेले शिवाय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे माहेरकडील नववे वंशज
एका सामान्य शेतकरी घरी जन्म झालेले सालगड्याचा मुलगा संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये संपुर्ण धनगर समाज एकत्र मौजे चोंडी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जंयतीला आणुन समाजाला योग्य दिशा देणारे.
स्वर्गीय लोकनेते गोपींनाथराव मुंडे यांच्या तालमित वाढलेले मुख्यमंत्री देंवद्र फडवणीस यांचे विश्वासू प्रा.रामजी शिंदे यांची विधान परिषेदेवर आमदार म्हणून निवड करुन पक्षाशी एकनिष्ठ राहणारा नेताला न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रा. शिंदे यांनी कर्जत – जामखेड विधानसभा 2019 निवडणुकीत पराभव झाला. पण मागील विधानसभा निवडणुकी पेक्षा 10 हजार जास्त मतदान प्रा. रामजी शिंदे यांनी घेतले.
चांगल्या कामकरण्यार्या तसेच सर्व बहुजन समाजाला सोबत घेवुन विकास काम करणारा तसेच पहिल्या पासुन भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ काम करणार्या माणसाला न्याय देणाचे काम भारतीय जनता पार्टीने करावे अशी आमची मागणी
असल्याचे माने यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती भाजपचे नेते निशांत दातीर यांनी दिली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®