जिल्ह्याच्या महसूल सीमेच्‍या हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश जारी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  जिल्हयात 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत जिल्ह्याच्या महसूल सीमेच्‍या हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हे आदेश जारी केले आहेत. दरम्यान या आदेशानुसार खालील बाबींना मनाई करण्यात आली आहे.

यात, शस्त्रे, काठया, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, दंडे अगर लाठया किंवा शारिरीक इजा करणेसाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर बाळगण्यास वर्ज्य करण्यात आले आहे.

तसेच क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे व साधणे जवळ बाळगणे किंवा तयार करणे किंवा जमा करणे.

कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे. जाहीरपणे घोषणा.

देणे, गाणे म्हणणे, वादय वाजविणे, यांना देखील बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेणेस मिरवणूका काढणे

आणि पाच पेक्षा जास्त व्यक्‍ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश खालील व्‍यक्‍तीस आदेश लागु होणार नाही.

यामध्ये,शासकीय सेवेतील व्यक्‍तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पुर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच ज्या व्यक्‍तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे.

वेळोवेळी निर्गमित होणारे प्रतिबंधात्मक आदेशात सवलत दिलेल्या बाबींस / व्यक्‍तींस लागु होणार नाहीत, असे कळविण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24