Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Property Documents : प्रॉपर्टीचे कागदपत्रे गहाळ झाल्यास काय करावे? काळजी करू नका; फक्त करा हे काम

Property Documents : प्रॉपर्टीची कागदपत्रे खूप महत्वाची असतात. ते नेहमी जपून ठेवले पाहिजेत. मात्र तरीही चुकून आपल्याकडून एखादी कागदपत्र हरवल्यात व सापडले नसल्यास काय करावे लागेल याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आपल्याकडे असणारे संपत्तीची कागदपत्रे सुरक्षित राहण्यासाठी काही व्यक्ती बँक लॉकरचाही वापर करत असतात. संपत्तीची कागदपत्रे ही महत्त्वाची असतात. त्याशिवाय आपण आपल्याकडे असणारी संपत्ती भविष्यात विकू शकत नाही. आपल्याकडे प्रॉपर्टीची कागदपत्रे असतील तर आपण कायदेशीर रित्या त्या संपत्तीचे मालक असतो हे सिद्ध होत असते.

मात्र ही कागदपत्रे आपल्याकडून हरवली अथवा कुठेतरी विसरली तर काय? या प्रॉपर्टीचा हक्क याविषयीचा गैरफायदा घेऊन त्यावर अधिकार गाजवू शकतो. आपल्या प्रॉपर्टी चे कागदपत्रे गहाळ झाल्यास काय करावे याबद्दल आपण माहिती घेऊ.

सर्वात अगोदर गुन्हा नोंद करा-

जर आपले प्रॉपर्टीची कागदपत्रे गहाळ झाले असल्यास, आपण त्वरित जवळ असणाऱ्या पोलीस स्टेशनची संपर्क करून तिथे एफ आय आर नोंदवावी. आपले कागदपत्रे कुठेतरी हरवले आहेत किंवा कुठेतरी विसरले आहेत याबद्दल पोलीस स्टेशनला माहिती देण्यात यावी. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केल्यानंतर त्या गुन्ह्याची एक प्रत आपल्याजवळ ठेवून घ्यावी.

आपल्याला जर शक्य असेल तर आपण याबद्दलची माहिती इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन अथवा सब रजिस्टर यांना अर्जाच्या माध्यमातून द्यावे. आपल्याकडील कागदपत्र कसे हरवली याबद्दल माहिती लेखी स्वरूपात देण्यात यावी. तसेच वर्तमानपत्रात याबाबतची नोटीस जाहीर करण्यात यावी.

स्टॅम्प पेपर वर नोंदणी करा-

आपल्याकडील मूळ कागदपत्रे हरवल्यामुळे स्टॅम्प पेपरवर नोंदणी करून घेण्यात यावी. यामध्ये आपल्याकडे असणारे मालमत्तेची संपूर्ण माहिती देणे गरजेचे असते. हरवलेल्या काही कागदपत्रांची माहिती, FIR तयार केलेले नोंदणी ची माहिती, तसेच पोलीस स्टेशन विषयी माहिती यामध्ये देण्यात यावी.

त्यानंतर फास्ट टाइम पेपर रजिस्टर ऑफिसला जमा करावा. आपण जर हाउसिंग सोसायटीमध्ये राहत असेल तर, रेसिडेन्सी वेल्फेअर असोसिएशन किंवा RAW कडून आपण डुबलीकेट सर्टिफिकेट घेऊ शकतो.

आपल्या प्रॉपर्टी चे डुप्लिकेट प्रमाणपत्र घ्या-

हे सर्व प्रोसेस केल्यानंतर आपण रजिस्टर ऑफिसला डुबलीकेट कागदपत्रासाठी अर्ज करावा. याकरिता आपल्याला आपण नोंदवलेली एफ आय आर ची कॉपी, वर्तमानपत्रात दिलेली जाहिरातीची कॉपी नोटरी अटेस्टेड केलेले अंडर टेकिंग, त्याचबरोबर काही प्रोसेसिंग फी आपल्याला रजिस्टर ऑफिसला जमा करावे लागते. या सर्व प्रोसेस नंतर आपल्याला डुप्लिकेट कागदपत्रे मिळतात.