उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरामपूर येथील बलात्कार घटनेचा निषेध कार्यकर्त्यांना अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरामपूर मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा निषेध नोंदवून शहरातील निलक्रांती चौक येथे रास्ता रोको करण्यात आले.

यावेळी तोफखाना पोलीसांना आंदोलकांना अटक केली. या आंदोलनात माजी नगरसेवक अजय साळवे, आरपीआयचे युवक शहर अध्यक्ष अमित काळे, विजय भांबळ, किरण दाभाडे,

अशोक केदारे, दिपक गायकवाड, विनोद भिंगारदिवे, चंद्रकांत भिंगारदिवे, सनी खरारे, मंगेश मोकळ, संतोष सारसर, गौतम कांबळे, दया गजभिये,

अविनाश भोसले आदींसह आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला.

संपूर्ण देशात आंध्र प्रदेश आणि तेलंगानाच्या धर्तीवर दिशा कायदा लागू करावा, बलात्कार प्रकरणातील आरोपींची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होऊन एक वर्षात निकाल लावावा,

सदर प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, पीडित कुटुंबीयांना 50 लाख रुपये मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत समावेश करावा,

दोन्ही घटनांची सीबीआय चौकशी होऊन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, पीडित कुटुंबाला शासन तर्फे उत्तम दर्जाचा विशेष सरकारी वकील देण्याची मागणी करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24