अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- हरियानातील निकीता तोवर या युवतीच्या हत्येचा शिवराष्ट्र सेना या पक्षाच्यावतीने नगरमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले. याबाबत १९५0 पासून आजपर्यंत सरकारने कोणतेच ठोस पाऊल महिलांच्या सुरक्षितेतेबाबत उचलेले दिसून येत नाही.
त्यामुळे भारतात छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महापुरुष होऊन गेले की ज्यांनी शत्रुंच्या महिलांचा मातेसमान आदर केला व त्यांचे भारतात रक्षण केले.
त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भारतात व महाराष्ट्रात असे निर्दयी क्लेषदायक घटना घडत आहेत.तरी हरियानात झालेला हा प्रकार निंदनीय आहे.
निकीता तोवर हिला इस्लाम धर्म स्वीकार व माझ्यासोबत लग्न कर, अशी विविध प्रकारची मागणी तौसिफ या युवकाने केली. या मागणीस निकीताकडून नकार मिळाल्याने तिची हत्या करण्यात आली.
त्यामुळे देशातील ११0 कोटी हिंदुंवर महिला संरक्षणाची जबाबदारी वाढली आहे. तरी या निंदनीय घटनेचा शिवराष्ट्र सेनेचे पक्षाध्यक्ष संतोषभाई नवसुपे यांनी आरोपी तौसिफ यास त्वरित फास्ट कोर्टातून शिक्षा व्हावी,
ही मागणी शासनाकडे केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवराष्ट्र सेनेकडून काळ्याफिती लावून व निषेध नोंदवून निकीता तोवर हिस श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी पक्षाध्यक्ष संतोषभाई नवसुपे, संग्राम सूर्यवंशी, भैरवनाथ खंडागळे, बाळासाहेब जाधव, राधाकिसन कुलट, ओंकार वाघ, योगेश इंगळे आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved