या तीन पायांच्या सरकारचा निषेध – माजी आमदार वैभव पिचड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- तीन पायांच्या या राज्य सरकारचा कोरोना महामारीच्या संकटात नियोजनशून्य काम केल्यामुळे सर्वच पातळीवर ते अयशस्वी ठरले.

राज्यातील आदिवासी खावटी वाटपात दुजाभाव केल्याने आज ग्रामीण आदिवासी, शेतकरी, शेतमजूर जनतेला उपासमारी सारख्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.

भाजपच्यावतीने आम्ही काळे मास्क व काळे झेंडे दाखवून या तीन पायांच्या सरकारचा निषेध करत आहोत, अशी प्रतिक्रिया माजी आमदार व भाजप नेते वैभव पिचड यांनी व्यक्त केली.

अकोले तालुक्यात ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवत भाजप कार्यकर्त्यांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळत ठाकरे सरकारचा निषेध केला. राजूर येथे माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

राजूर येथे वैभव पिचड यांच्या उपस्थितीत पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय देशमुख, सरपंच गणपत देशमुख, उपसरपंच गोकुळ कानकटेे,

भास्कर येलमामे, संतोष बनसोडे, अभिजित नवळी, संजय अवसरकर, दत्तात्रय निगळे, संजय सूर्यवंशी, संतोष बनसोडे, सीताराम भांगरे, यशवंत अभाळे यांनी अंदोलन केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24