अभिमानास्पद! फ्लिपकार्टचे नवीन रूप मराठी भाषेत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-  ई कॉमर्स साईटवर मराठी भाषा असावी अशी मनसेची इच्छा होती.

मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यावरुन अ‍ॅमेझॉन आणि मनसे मध्ये झालेला संघर्ष ताजा असताना, आता फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांना मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

ऑक्टोबर महिन्यात मनसेने फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनने मराठीत अ‍ॅप आणलं नाही तर त्यांची दिवाळी मनसे स्टाईलने साजरी होईल असा इशारा दिला होता.

त्यामुळे त्यांनी मराठी भाषेत अँप आणण्यात येईल असे सांगितले होते. त्यानंतर फ्लिपकार्टने महत्त्वाचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार फ्लिपकार्टने ग्राहकांना मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देत आपला शब्द पाळला आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या भाषांव्यतिरिक्त अन्य अनेक भाषांचाही फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवर समावेश असणार आहे. असही त्यांनी म्हटलं आहे.

यामुळे भारतीय ग्राहकांसाठी ई कॉमर्स अधिक सर्वसमावेशक सहज उपलब्ध करून देण्याची आपली बांधिलकी फ्लिपकार्टने अधिक बळकट केली आहे.

दरम्यान, फ्लिपकार्ट मध्ये आता इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ आणि तेलुगु अशा सहा महत्त्वाच्या भाषा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24