अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- महाराष्ट्रात विविध भागात पावसाने थैमान घातले होते यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार शरद पवार हे भेटी देत आहेत.
त्याचप्रमाणे नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात आज मी सुद्धा नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. महाराष्ट्रात अशी परिस्थिती असताना ज्यांचे घर पाण्याखाली बुडाले, काही ठिकाणी घरे वाहून गेलेली आहेत,
अनेकांची शेती वाहून गेली आहे अश्या निराधार कुटुंबाना मोफत अन्न धान्य पुरवठा करणार असल्याची माहिती अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. महाराष्ट्रातील सोलापूर, उस्मानाबाद, लातूर,
नांदेड या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती, रस्ते वाहून गेलेले आहेत. काही घरे देखील दोन-दोन दिवस पाण्याखाली आहेत.
अश्या पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्र शासनाकडून प्रती कुटुंब १० किलो गहू,१० किलो तांदूळ आणि ५ लिटर केरोसिनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे. अशी माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved