अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- शिवराष्ट्र सेना पक्षाच्या एकदिवस कार्यकर्ता मेळावा नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यात पक्षाच्यावतीने काढण्यात आलेल्या शासकीय योजनांचे पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय पितळे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब करपे, ज्येष्ठ पदाधिकारी भैरवनाथ खंडागळे, राधाकिसरण कुलट, आदि उपस्थित होते.
यावेळी शिवराष्ट्र सेना युवा प्रमुख शंभुराजे नवसुपे यांनी सांगितले की, केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ संबंधिताना मिळविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
शिवराष्ट्र सेनेच्यावतीने या शासकीय योजनांची माहिती पुस्तिका तयार करण्यात आली असून, त्याद्वारे शेतकरी, महिला, विद्यार्थी छोटे-मोठे व्यावसायिक यांच्याकरीत ज्या योजना आहेत,
त्यांची माहिती, कर्ज, सबसिडी, संबंधित कार्यालये आदिंची माहिती एकत्रित करण्यात आलेली आहे. त्यामुळे या पुस्तिकेद्वारे योजनेचा लाभ मिळण्यास सहाय्य होणार आहे.
युवा कार्यकर्त्यांनी याबाबत जनजागृती करुन या योजना वंचित घटकांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे व त्याचा लाभ संबंधितांना मिळवून द्यावा, असे आवाहन केले.
याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे म्हणाले, शिवराष्ट्र पक्ष हा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहे. या पक्षात अनेक लोक जोडले जाऊ राहिले आहेत.
विविध आघाड्यांच्या माध्यमातून समाजातील प्रश्न सोडविण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत. आता शासकीय योजनांची पुस्तिकाचे प्रकाशन करुन लाभार्थ्यांना दिशा देण्याचे काम पक्षाच्यावतीने होईल, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत पवार यांनी केले तर आभार ओमकार जाधव यांनी मानले. याप्रसंगी प्रशांत देठे, अनुप गांधी, राजू चावक, अशिष म्हस्के, धनंजय डोके,
अजय अपुर्वा, माऊली बादाडे, नवनाथ नागरगोजे, विवेक डफळ, धनंजय डोके, साहिल सोनटक्के, ऋषी शिंदे, निलेश जायभाय, विजय जगताप आदि उपस्थित होते.