महाराष्ट्र

Pune Crime News : किशोरवयीन मुलावर महिलेचा अत्याचार

Published by
Ahmednagarlive24 Office

Pune Crime News : किशोरवयीन मुलावर एका महिलेने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा व त्याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी पुण्यातील कोंढवा परिसरात उघडकीस आला. यासंदर्भात चौकशीसाठी या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.

या किशोरवयीन मुलाने यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. संशयित आरोपी असलेली महिला या मुलाच्या घराशेजारी राहायला आहे. तिने त्याच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

तसेच वेळोवेळी ब्लॅकमेल करून ती त्याच्यावर अत्याचार करत होती. पोलिसांकडे तक्रार करण्याची भीती दाखवून गेली दोन वर्षे तिचे हे चाळे सुरू होते. तिने या मुलासोबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले.

त्यानंतर या मुलाने पालकांना सर्व प्रकार सांगितला. त्यांनी या महिलेविरुद्ध रविवारी रीतसर तक्रार दिली. यासंदर्भात या महिलेविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पॉक्सो) गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे हे तपास करत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office