Pune Metro Update:- पुणे हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असून महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये पुणे शहराने खूप मोठी प्रगती केली असून वेगाने विकसित होत असलेले हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील शहर म्हणून ओळखले जाते. साहजिकच विकासाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर वाढती लोकसंख्या व त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी उभारल्या जात असणाऱ्या पायाभूत सुविधा यांना महत्व असते व अशा सुविधा पुण्यात देखील खूप गरजेच्या आहेत.
वाढती लोकसंख्या व त्या माध्यमातून होणारी वाहतुकीची समस्या सोडवण्याकरिता पुणे शहरांमध्ये पुणे रिंग रोड, पूर्ण मेट्रोचे काही टप्पे सुरू करण्यात आलेले आहेत. पुणे रिंग रोडचे काम देखील आता प्रगतीपथावर येईल अशी शक्यता आहे. पुणे मेट्रोचे जे टप्पे सध्या सुरू आहेत त्यांना प्रवाशांचा उदंड असा प्रतिसाद मिळत असून त्याच धर्तीवर आता पुण्याचे हृदय समजले जाणारे स्वारगेट ते शिवाजीनगर पर्यंत देखील लवकरच मेट्रो धावेल अशी शक्यता आहे. त्याच अनुषंगाने आपण याबाबत असलेली महत्त्वाची अपडेट घेणार आहोत.
स्वारगेट ते शिवाजीनगर दरम्यान धावणार मेट्रो
पुणे शहरातील जर आपण स्वारगेट ते शिवाजीनगर यादरम्यानच्या मेट्रो मार्गाचा विचार केला तर यामध्ये स्वारगेट मेट्रो स्टेशनचे महत्त्व अनन्यसाधारण असून सध्या या स्थानकाचे काम 85% पर्यंत झाले असून लवकरात लवकर या स्थानकाचे काम पूर्ण व्हावे याकरिता मेट्रोकडून देखील युद्ध पातळीवर काम हाती घेण्यात आलेले आहे.
याव्यतिरिक्त मंडई व बुधवार पेठ या ठिकाणी देखील भूमिगत मेट्रो स्थानकांचे काम होत असून या दोन्ही स्टेशनच्या अगोदर स्वारगेट भूमिगत मेट्रोस्थानकाचे काम होईल असा विश्वास मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नुकताच पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असून पुढच्या दोनही टप्प्यांचे कामे आता युद्ध पातळीवर सुरू आहेत. यातील रुबी हॉल स्थानक ते रामवाडी हा जो काही मेट्रोचा टप्पा आहे तो लवकर सुरू करण्यात येईल अशी शक्यता आहे
व सिविल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो मार्गावरील तीन ठिकाणी असलेल्या भुयारी स्थानकांची कामे अजून पूर्ण झालेली नसल्यामुळे या टप्प्यावरची मेट्रो अजून सुरू व्हायला वेळ लागू शकते.परंतु या तीनही स्थानकांची कामे एकाच वेळी करण्यात येत आहेत. मेट्रोच्या स्वारगेट मेट्रो स्थानकाचे काम युद्धपातळीवर सुरू असून मेट्रोच्या माध्यमातून या स्थानकाचे दोन मजले बांधण्यात येणार आहेत व त्यानंतर वरील जे काही मजले येतील ते पीपीपी तत्त्वावरील भागीदारांच्या माध्यमातून बांधण्यात येणार आहेत.
कुठपर्यंत आले आहे स्वारगेट भूमिगत स्थानकाचे काम?
स्वारगेटला पुण्याचे हृदय म्हणून देखील ओळखले जाते. या ठिकाणाहून दररोज लाखो नागरिकांची व वाहनांची ये जा होत असते त्यामुळे या ठिकाणच्या स्थानकाला खूप मोठे महत्त्व असून याच ठिकाणहून पीएमपीएचे देखील प्रवासी खूप मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. या दोनही स्टेशनच्या जागांवर मेट्रो कडून भव्य असे व्यावसायिक स्थानक मल्टी मॉडेल हब उभारण्यात येत आहे. या स्थानकाचे काम सध्या 85 टक्के पूर्ण झाले असून सध्या एलिव्हेटेड इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
स्वारगेट भूमिगत स्थानक हे पिंपरी कडून भूमिगत मार्गीकेतील शेवटचे स्थानक असून त्याची लांबी 180 मीटर ते रुंदी 24 मीटर आहे. या स्थानकाच्या वरच्या बाजूला एसटी आणि पीएमपीचे स्थानक असणार आहे व या ठिकाणी सायकल तसेच रिक्षा, दुचाकी तसेच पादचारी ट्रॅकचे देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे.
हे स्थानक संपूर्णपणे एअर कंडिशनर अर्थात वातानुकूलित असणार असून या ठिकाणी आठ सरकते जिने व लिफ्ट देखील उभारण्यात येत आहे. अजूनपर्यंत 45% काम पूर्ण झाले असून लवकरच उर्वरित काम देखील पूर्ण होऊन स्वारगेट ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे.