Pune Neo Metro : पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मधील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे,बीआरटी आणि मेट्रो राबविल्यानंतर आता निओ मेट्रोचा प्रयोग राबविण्याची तयारी सुरू आहे. भोसरी ते चाकण या मार्गावर ‘ही निओ मेट्रो करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे.
त्यानुसार या प्रकल्पावर जवळपास दीड हजार कोटींचा खर्च होणार आहे. पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत वेगवेगळ्या मार्गावर मेट्रो प्रकल्प सुरू आहेत. पुणे शहराच्या निमित्ताने झालेल्या मेट्रोच्या या प्रयोगाचे ‘यश अपयश आताच्या घडीला तरी अधांतरी आहे. महामेट्रो कंपनी स्थापन करून पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो प्रकल्प राबविण्यात आला. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मेट्रो प्रत्यक्षात रुळावर उतरली.
परंतु, प्रत्यक्षात सार्वजनिक वाहतुकीसाठी फायदेशीर ठरेल, इतकी घाव घेण्यास मेट्रोला आणखी काही अवधी लागणार आहे, ‘पीएमआरडीएकडून देखील नवीन काही मेट्रो मार्गाचे काम सुरू झाले आहे. शहरी भागाला लागून तळेगाव व चाकणच्या कारखानदारीमुळे या भागात झपाट्याने नागरिकरण वाढत आहे.
त्यात नाशिक महामार्गाच्या बाजूने चाकण, राजगुरूनगरपर्यंत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढू लागली आहे. याचा विचार करून नाशिक फाटा ते चाकण असा मेट्रो मार्ग करण्याचा विचार सुरू होता. मात्र, मेट्रोएवजी या मार्गावर कमी खचार्चा निओ मेट्रो प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव सुरू आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत रिंगरोड (एचसीएमटीआर) प्रकल्पात नाशिक फाटा ते भोसरी हा ८ किलोमीटर अंतराचा समावेश आहे. त्यामुळे हे अंतर वगळून भोसरी ते चाकण या १६.११ किलोमीटर अंतरावर निओ मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल करण्याच्या सूचना महापालिकेने महामेट्रोला दिल्या होत्या. त्यानुसार महामेट्रोने हा डीपीआर तवार करून पिंपरी चिंचवड महापालिकेला १३ डिसेंबर २०२२ ला सादर केला आहे.
त्यासाठी ९ हजार ५४८ कोटी १४ लाखांचा खर्च ओपेक्षित आहे महापालिकेच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव राज्य आणि नंतर केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. पिंपरी चिंचवड महापालिकेने बीआरटी बससेवेचा प्रयोग केला. या प्रयोगाची पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील स्थिती चिंतनाचा विषय आहे.
आता प्रशासकीय यंत्रणाच हे बीआरटी मार्ग उखडून फेकण्याची भाषा वापरू लागल्या आहेत. नंतर दोन्ही शहरांनी मिळून मेट्रो आणली. मेट्रे दोन्ही शहरात धावू लागली आहे. परंतु, मेट्रोच्या कामाची प्रगती पाहता सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो लाभदायी की तापदायी, असा प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली आहे.
याच स्थितीत भोसरी,चाकणसारख्या सवांधिक कामगार, शेतकरी वर्ग प्रवासी असलेल्या मार्गावर आणखी एक नवीन प्रयोग महापालिका करू पाहत आहेत. त्यामुळे यापूर्वी झालेले प्रयोग, त्यावरील खर्च आणि लोकोपयोगिता याचा विचार करून नवे आणि मोठे खर्चिक प्रकल्प राबविले जावेत, ही अपेक्षा प्रशासकीय यंत्रणांकडून आहे. अन्यथा करदात्यांचा वारेमाप पैसा खर्च करून आपली प्रयोगाची हौस भागवून घेऊ नये, हेच काय ते त्यांना सांगणे आहे.
निओ मेट्रो म्हणजे नेमकी असते तरी काय? :- भोसरी ते चाकण मार्गावर हायस्पीड टारबेस्ड एलिव्हेटेड निओ मेट्रो असणार आहे. ती रब्बरचे टायर असलेली इलेक्ट्रीक एसी (वातानुकूलीत) बस असेल.निओ मेट्रोचे कोचेस, सोयीसुविधा, स्टेशन व इतर सगळे मेट्रोप्रमाणे आहे. त्याच्या एका कोचमध्ये सुमारे १८० ते २५० प्रवासी प्रवास करू शकतात.
ती एकावेळी तीन कोचेससह धावते. भोसरी ते चाकण या १६. ११ किमी मार्गावर एकूण ११ स्टेशन असतील. यामध्ये भोसरी डिस्ट्रीक्ट सेंट्रल (पूर्व), पीआयईसी सेंटर, बनकरवाडी, भारतमाता चौक, चिंबळी फाटा, बार्गे वस्ती, कुरूळी, आळंदी फाटा, मुक्तेवाडी, तळेगाव चौक, चाकण चौक हे स्टेशन असतील.