त्या अंगणवाडी सेविकेने केली कोरोनावर मात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- तब्बल १४ दिवस आयसीयूमध्ये असलेली पुण्यातील अंगणवाडी सेविका करोनाला हरवून वेगाने बरी होत आहे.

मंगळवारी या महिलेचा व्हेंटिलेटर काढण्यात आला आहे. अशा अवस्थेतून बरी होणारी संबंधित महिला देशातील पहिली रुग्ण ठरली आहे.

संबंधित अंगणवाडी सेविकेने ३ मार्च रोजी पुणे ते वाशी असा कॅबने प्रवास केला होता. ६ मार्चपासून या महिलेस करोनासदृश लक्षणे होती.

मात्र, परदेश प्रवास तसेच परदेशी व्यक्तीच्या संपर्कात न आल्याने हा ताप व्हायरल असेल, असा समज करत या महिलेने सिंहगड रस्ता येथील एका रुग्णालयात उपचार घेतले.

त्यानंतर त्रास वाढल्याने या महिलेस १६ मार्च रोजी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने भारती हॉस्पिटल येथील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

या महिलेस स्वाइन फ्लू असण्याची शक्‍यता लक्षात घेऊन डॉक्‍टरांनी त्यांचे घशातील स्रावाचे नमुने एनआयव्हीला पाठवले मात्र, हा अहवाल निगेटिव्ह आला.

त्यानंतर पुन्हा १९ मार्चला स्रावाचे नमुने पाठवत करोनाची तपासणी करण्यात आली. यावेळी अहवाल पॉझिटिव्ह आली. या महिलेला संसर्ग कसा झाला,

या विचारानेच भविष्यात करोना वेगाने पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, भारती हॉस्पिटलने प्रभावीपणे उपचार करत या महिलेला जीवघेण्या आजारातून वाचवले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24