Pune Ring Road Update:- महाराष्ट्र मध्ये अनेक रस्ते प्रकल्प नियोजित असून काही प्रकल्पांचे काम सध्या सुरू झालेले आहेत. तसेच बऱ्याच शहरांमध्ये रिंग रोड तसेच उड्डाणपूलांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अशा प्रकल्पांमुळे मोठ्या शहरांमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवणे व दोन ठिकाणांमधील प्रवासाचे अंतर कमीत कमी करणे शक्य होणार आहे.
तसेच रस्ते प्रकल्पांमुळे राज्यातील बऱ्याच मोठमोठे शहरातील कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. अगदी याच पद्धतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांमध्ये होणारी वाहतूक कोंडी ही कायमची समस्या असून प्रवाशांची यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर डोकेदुखी होते.
त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ भारतात एमएसआरडीसीच्या माध्यमातून 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा रिंग रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आलेले असून दोन टप्प्यांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाचे पश्चिम आणि पूर्व असे दोन भाग करण्यात आलेले असून पश्चिम मार्गावर भोर तालुक्यातील पाच, हवेली तालुक्यातील 11, मुळशी तालुक्यातील 15 आणि मावळ तालुक्यातील सहा गावांचा समावेश करण्यात आलेला असून याकरिता 650 हेक्टर जागेची आवश्यकता आहे व ती निश्चित करण्यात आलेली आहे.
यानुसार एकूण 34 गावांपैकी एकतीस गावांमधील 644 हेक्टर जमिनीची भूसंपादनाचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे व त्याकरिता 2975 कोटीचा निधी देखील वितरित करण्यात आलेला आहे. लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्याचे वित्त मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी रिंगरोडचे काम सुरू राहावे याकरिता 10519 कोटी रुपयांना मंजुरी दिली
व त्यामुळे संमती पत्र दिलेल्या गावातील शेतकऱ्यांचे निवाडे, ज्या शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून सक्तीने भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.परंतु आता या भूसंपादनाच्या प्रक्रियेला ब्रेक लागण्याची शक्यता आहे व त्यामागील प्रमुख कारण आहे लोकसभा निवडणुक व आचारसंहिता हे होय.
पुणे रिंग रोडच्या भूसंपादनाला ब्रेक
सध्या देशामध्ये आणि राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून त्यानुसार देशात व राज्यात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीची महत्त्वाची कामे देण्यात आलेली आहेत.
त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून म्हणजेच एमएसआरडीसी कडून सुरु करण्यात आलेल्या रिंग रोड रस्त्याच्या भूसंपादनाला आता वेळ होणार असल्याचे निश्चित झाल्याने आचारसंहिता संपण्याची वाट आता पहावी लागणार आहे. पुणे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर या जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघाचे दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
त्यामुळे सर्व महसूल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांना निवडणुकीच्या कामकाजाच्या जबाबदारी देण्यात आल्यामुळे याचा परिणाम पुणे रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेवर होणार आहे.
इतकेच नाहीतर तालुका पातळीवरील तहसीलदारापासून ते केंद्रप्रमुख व इतर कर्मचाऱ्यांना निवडणुकांच्या संबंधित कामे देण्यात आल्यामुळे ते कामांमध्ये व्यस्त आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसहिता ही 6 जून पर्यंत असल्याने तोपर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासकीय दृष्टीने केवळ
निवडणुकीच्याच कामामध्ये लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे व त्या पद्धतीचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पुणे रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेतील कामांना विलंब लागण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.