महाराष्ट्र

पुणे रिंग रोडच्या कामाला येणार आता गती! तब्बल 42 हजार 711 कोटी रुपये खर्चाच्या रिंग रोडच्या कामासाठी आता….

Published by
Ajay Patil

Pune Ring Road Update:- पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा जो काही प्रश्न आहे तो सुटावा याकरिता पुणे रिंगरोड प्रकल्प अतिशय महत्त्वाचा असून साधारणपणे डिसेंबर 2023 मध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला व याचा प्रस्ताव सगळ्यात आधी 1998 मध्ये मांडण्यात आला होता व त्यानंतर 2016 मध्ये या प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर झाला.

परंतु सध्याची जर या प्रकल्पाची स्थिती बघितली तर दरम्यानच्या काळामध्ये आवश्यक असलेल्या भूसंपादनाला विलंब होत असल्यामुळे या प्रकल्पाचे बरेच काम सध्या रखडल्याचे चित्र आहे. पुण्यातील 83 गावांना जोडणारा पुणे रिंगरोड प्रकल्प साधारणपणे 170 किलोमीटर लांबीचा असणारा असून हा प्रकल्प पुणे ते अहमदनगर, पुणे ते सोलापूर,

पुणे ते बेंगलोर, पुणे ते नाशिक आणि पुणे ते मुंबई सारख्या प्रमुख महामार्गांना देखील जोडला जाईल अशी शक्यता आहे. त्यामुळे पुणे रिंगरोड अनेक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असा ठरणार आहे.

या रिंगरोडच्या बाबतीत एक महत्त्वाचे अपडेट सध्या समोर आले असून 42 हजार 711 कोटी रुपये खर्चाच्या या रिंगरोडच्या नऊ पॅकेजेच्या कामांकरिता आता पाच ठेकेदार कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता या रिंग रोडच्या कामाला गती येईल अशी एक शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे रिंग रोडच्या नऊ पॅकेजच्या कामांसाठी पाच ठेकेदार कंपन्यांची निवड
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाचा असलेला 42 हजार 711 कोटी रुपये खर्चाच्या रिंग रोडच्या नऊ पॅकेजच्या कामाकरिता आता पाच ठेकेदार कंपन्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये नवयुग कंपनीला तीन पॅकेजची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे व पीएनसी कंपनीला चार पॅकेजेच्या कामाचे वर्क ऑर्डर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच मेघा कंपनीला तीन, जीआर आणि रोडवेज या कंपन्यांना प्रत्येकी एक अशा पाच पॅकेजसाठी वर्कऑर्डर देण्याची प्रक्रिया एमएसआरडीसी अर्थात राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

या टेंडर प्रक्रियेमध्ये जीआर इन्फ्रा प्रोजेक्ट, पीएमसी इन्फ्राटेक, रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा, मेघा इंजीनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड पात्र ठरले आहेत.

जेव्हा विधानसभा आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती तेव्हा त्यामध्ये रिंग रोडसाठी 42 हजार 711 कोटी रुपयांच्या सुधारित प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती व आचारसंहिते अगोदरच या रिंग रोडसाठी आवश्यक असलेले 90% भूसंपादन देखील पूर्ण करण्यात आले आहे.

आता या रिंगरोडचे नऊ पॅकेजेस करिता पाच कंपन्यांना हे टेंडर मिळाले आहे. हे सर्व नऊ पॅकेजेस एकाच वेळी सुरू करण्याचा आग्रह हा महामंडळाच्या अधिकारी व कंत्राटदारांचा आहे. या रिंग रोडच्या कामाचे टप्पे सिंहगड, खडकवासला तसेच मुळशी, उर्से, हिंजवडी, सरतापवाडी आणि चाकण येथून सुरू होतील असे सांगितले जात आहे.

रिंगरोडच्या ‘या’ कामांना देण्यात आली सुधारित मान्यता
महत्वाचे म्हणजे पुणे रिंग रोडच्या पूर्व भागात उर्से ते सोलू आणि सोरतापवाडी( पुणे-सोलापूर रस्ता) या रस्त्याच्या 19 हजार 932 कोटी 98 लाख रुपये इतक्या किमतीच्या कामांना सुधारित मान्यता देण्यात आली आहे व त्यासोबतच पश्चिम भागातील उर्से ते वरवे बुद्रुक म्हणजे सातारा रोड साठी 22 हजार 778 कोटी पाच लाख रुपये इतक्या किमतीच्या कामांना सुधारित मान्यता देण्यात आलेली आहे.

रिंग रोडच्या कामासाठी तयार करण्यात आलेले जे काही अंदाजपत्रक होते त्यापेक्षा 40 ते 45 टक्के जादा दराने टेंडर आल्याचे समोर आले होते व त्रयस्थ संस्थेमार्फत या टेंडरची छाननी करून घेतल्यानंतर आणि पात्र ठरलेल्या कंपन्यांशी तडजोड करून वीस ते पंचवीस टक्के जादा दराने काम देण्याचा निर्णय महामंडळाने यामध्ये घेतला आहे.

Ajay Patil