अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर शहरातील रेल्वे स्टेशन भागात पंचशीलनगर परिसरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीला काल दुपारी १२ . ३० च्या सुमारास पुण्यातील एका तरुणाने पळवून नेले.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, येरवडा परिसरात राहणारा आरोपी अक्षय जमदाडे याने कायदेशीर रखवालीतून त्याच्या दुचाकीवर बसवून काहीतरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले.
मुलीच्या वडिलांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिल्यावरून पुण्याचा आरोपी अक्षय जमदाडे याच्याविरुद्ध भादवि कलम दाखल करण्यात आला आहे.
पोनि वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. पोसई महाजन हे अल्पवयीन मुलीचा व आरोपीचा कसून शोध घेत आहेत . या घटनेने पालक वर्गात खळबळ उडाली आहे.