राधाकृष्ण विखे पाटील यांना कृषी मंत्रीपद मिळणार ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : राज्याचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील लवकरच कमळ हाती घेत भाजप च्या सरकारात मंत्री होवू शकतात.

माझ्या मंत्रीपदाबद्दल बोलण्यापेक्षा आधी मला वडिलांना मंत्री करायचे आहे’, अशी प्रतिक्रिया डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली.

नगर लोकसभा निवडणुकीत विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन करून संभाव्य केंद्रीय मंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी वडिलांबाबतची ही इच्छा बोलून दाखविली.

दरम्यान, नगर जिल्ह्यातील नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील जागा युतीने जिंकल्याने या विजयाचे किमयागार मानले जाणारे राधाकृष्ण विखे यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

येत्या दोन-तीन दिवसात ते हातात ‘कमळ’ घेण्याची चिन्हे आहेत. भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांना लगेच राज्याच्या मंत्रिमंडळात सहभाग देऊन कृषी मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24