अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील आणि पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभेत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नगरमध्ये पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राम शिंदेंसह अनेक भाजप नेत्यांनी विखेंविरूद्ध तक्रारी केल्या आहेत.
यासंदर्भात आज भाजपाची राज्यस्तरीय बैठक झाली यामध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यथा मांडल्या. यावेळी विखे पाटील पिता-पूत्रही हजर होते.
याबाबत बोलताना नाराजी वरिष्ठांकडे मांडायला हवी होती, मीडियासमोर नाही, असं म्हणत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली तक्रार करणाऱ्या भाजप नेत्यांना टोला लगावला.
मला वाटत नाही की नाराजी माझ्याबद्दल आहे. पण ज्यांची नाराजी आहे, त्यांनी ती वरिष्ठांकडे मांडायला हवी होती, प्रसारमाध्यमांसमोर सांगायची गरज नव्हती.
पक्षाला फायदा झाला की नाही, त्याबद्दल वरिष्ठ सांगतील, पक्षात एवढं मोठं काय झालं, असं मला वाटत नाही’ असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.