राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- राहुल गांधी यांनी केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्यांवरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ‘केंद्राने कृषी क्षेत्र ३-४ उद्योगपतींच्या दावणीला बांधण्यासाठी कृषी कायदे आणले आहेत.

यामुळे शेती पूर्णत: उद्ध्वस्त होऊन स्वातंत्र्यापूर्वीच्या स्थितीत जाईल’, असे ते म्हणाले.

‘मी स्वच्छ व्यक्ती आहे. मोदीच काय, कुणालाही घाबरत नाही. ते मला साधा स्पर्श करू शकत नाहीत. पण, गोळी घालू शकतात. संपूर्ण देश विरोधात गेला तरी मी एकटा संघर्ष करेल’, असेही ते यावेळी म्हणाले. राहुल यांनी यावेळी अर्णब व्हॉट्सॲप चॅटलिकवरूनही मोदींवर टीका केली.

‘पाकवरील हवाई हल्ल्याची माहिती केवळ पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री, हवाई दल प्रमुख व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना होती. पण, आता या पाचपैकी एका व्यक्तीने ही माहिती अन्य एका व्यक्तीला पुरवल्याचे स्पष्ट झाले आहे. हे गुन्हेगारी कृत्य आहे. ही माहिती देणाऱ्या व घेणाऱ्याची रवानगी तुरुंगात झाली पाहिजे.

ही प्रक्रिया आतापर्यंत सुरू होणे अपेक्षित होते. पण, ही माहिती मोदींनीच पुरवल्याचा संशय असल्याने ती अद्याप सुरू झाली नाही’, असे राहुल म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24