सत्ता नसताना विकास कामे करणारे राहुरीचे माजी आमदार आजही लोकप्रिय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-गेली 25 वर्षे केवळ सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावरच आमदार म्हणून राहुरी-पाथर्डी-नगर तालुक्यांसह नेवासाचे आमदार असतांना फक्त विकासाची कामे केली.

राजकारण करतांना समाजकारणाला महत्व दिले आजही माजी आमदार असले तरी जनतेच्या मनात ते आजी आमदार आहेत, सत्ता नसतांना विकास कामे करणारे राहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची आजही लोकप्रियता कायम राहिली, असे प्रतिपादन युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केले.

नगर-औरंगाबाद रोडवरील बुर्‍हाणनगर ग्रामपंचायत हद्दीतील गजराजनगर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ अक्षय कर्डिले यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ग्रा.पं.सदस्य श्रीधर पानसरे, किशोर कर्डिले, तात्या कर्डिले, बबलू सूर्यवंशी,

राजू पाखरे, राहुल माने, सागर मेट्टू, एकनाथ शिंदे, रमेश आंबेकर, राजू ठाणगे, अक्षय सकट, शक्ती कांबळे, गजराजनगरचे ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. श्री.कर्डिले पुढे म्हणाले, गजराजनगर ही खूप जुनी वसाहत आहे. आमदार कर्डिले यांनी या वसाहतीतील रस्ते,

लाईट, पाणी प्रश्‍न मार्गी लावले. या उपनगराजवळ तपोवन रोडवरील विविध उपनगरांत आमदार निधी, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्‍न सोडविले. गजराजनगरचा ड्रेनेजचा मुख्य प्रश्‍न होता तो आता मार्गी लागल्याबद्दल समाधान वाटते, असे ते म्हणाले.

राहुल माने यांनी प्रास्तविकात गजराजनगरमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा वस्तीचा विकास करणे. 2019 ते 2020 अंतर्गत 5 लाख रु.च्या ड्रेनेज कामांचा व 3 लाख रुपये रस्ता क्रॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ झाला. लवकरात लवकर हे काम चांगल्या दर्जाचे होईल, असे सांगितले.

यावेळी ग्रा.पं. सदस्य पानसरे मामा, तात्या कर्डिले यांनी आपली मनोगते व्यक्त केली. गजराजनगरचा हा प्रश्‍न आमदार कर्डिले साहेबांनी मार्गी लावल्याबद्दल राजू साखरे यांनी आभार मानले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24