पुण्यात ‘या’ ठिकाणी सेक्स रॅकेटवर छापा, तीन लॉजवर छापे ,तब्बल आठ जणांना बेड्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- भोसरी परिसरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या तीन लॉजवर पोलिसांनी छापे मारून तब्बल आठ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी वेश्या व्यवसाय चालणा-या हॉटेल आणि लॉजेसची माहिती काढून त्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. त्यानुसार भोसरी पोलिसांनी ही मोहीम राबवण्यात आली. पोलिसांनी खबरे पेरून माहिती काढली आणि एकाच दिवशी तीन लॉजवर छापे टाकले.

यामुळे वेश्या व्यवसाय चालवणा-यांचे धाबे दणाणले आहेत. भोसरी मधील धावडे वस्ती येथे साईराज लॉजवर छापा टाकला. त्यात चौघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. शास्त्री चौकातील सूर्या हॉटेल अँड लॉजवर दुसरा छापा टाकला. यात पोलिसांनी तिघांना अटक केली.

तिसरा छापा शास्त्री चौकातील वनराज हॉटेल बार रेस्टोरंट व लॉजिंग या लॉजवर टाकला. त्यात तिघांना अटक करण्यात आली. या ठिकाणी तरुणी, महिलांना पैशांचे अमिश दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जातो. आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 343, 370,

370 (अ), 188, 34, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956चे कलम 3, 4, 5, 6, 7 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भोसरी परिसरातील सेक्स रॅकेटवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे या गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. अवैध धंदे करणाऱ्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी पळता भुई थोडी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 

अहमदनगर लाईव्ह 24