राज ठाकरेंना त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला मोठा झटका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘मनसे’ झटका दिला आहे. एकाच वेळी ३२० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. प

दं देताना आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही, असा आरोपच या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे.

पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरुन हे राजीनामा सत्र सुरू झाले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या लोकांना मोठी पद देण्यात आली.

आधी त्यांनी स्वार्थासाठी पक्ष सोडला होता असा आरोप करत कल्याण पूर्वमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी पद नियुक्तीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

पदे देताना आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही, असा आरोपच पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे उपशहर अध्यक्ष संजय राठोड यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सुपूर्द केले आहे.

राजीनामा देणाऱ्यांमध्ये ५ शाखाध्यक्ष, २ विभागीय संघटक, ४ विभाग अध्यक्ष, सहा उपविभाग अध्यक्ष, ५८ उपशाखा अध्यक्ष, तसंच २३४ गट अध्यक्षांचा समावेश आहे. आता यावर मनसे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24