अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यात पाडापाडी केल्याचा आरोप भाजप नेत्यांनीच केल्यानंतर पक्षाने झाडाझडतीसाठी मुंबईत बैठक घेतली होती.
भाजपाच्या प्रदेश कार्यालयात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह संघटनमंत्री विजय पुराणीक यांच्या नेतृत्वात अमहदनगर जिल्ह्याच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली.
यानिमित्त विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच राम शिंदे व राधाकृष्ण विखे पाटील समोरासमोर आले होते.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नगर जिल्ह्यातील सर्व नाराज आमदारांचे म्हणणे ऐकून घेतले आहे.
या बैठकी नंतर प्रसार माध्यमांशी बोलताना राम शिंदे म्हणाले निवडणुकीनंतर पहिल्यांदाच विखे व आम्ही समोरासमोर आलो, त्यामुळे दोन्ही बाजू ऐकुण घेण्यात आल्या.
भाजपामध्ये या स्तरावर म्हणणं ऐकुण घेणं व त्याबाबत कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे व ते आज झालेलं आहे. आमचं देखील यामध्ये समाधान झालेलं आहे.
मला निश्चितपणे माहिती आहे की, कार्यवाहीसाठी जी व्यवस्था उभी करून माहिती घेण्यास सांगितली आहे, त्यानंतर त्याबाबत कार्यवाही होईल. दोन्ही बाजू ऐकुण घेतलेल्या आहेत.